Title

Future Plans

भविष्यकालीन योजना:

१) शेतमाल तारण योजने अंतर्गत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज वाटप करण्याचा मानस आहे.

२) तसेच सब यार्डवर तारण गोदाम साठवणुक क्षमता वाढविण्यात येईल.

३) ई-नाम योजने अंतर्गत १००% ई-गेट एंन्ट्री. ई ऑक्शन, ई पेमेंटची प्रभावती अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

४) फळ व भाजीपला व बडनेरा यार्डवर इलेक्ट्रॉनीक्स वजन काटा बसविण्याचा मानस आहे व फळे भाजीपाला विभागात मोठे शेड व काँक्रीटीकरण उभारण्याचा मानस बाजार समितीचा आहे.

५) धान्य बाजार आवारातील उर्वरित राहीलेले कॉक्रीटीकरण तसेच नादुरुस्त असलेले काँक्रीटीकरणाचे का करण्यात येणार आहे.

६) धान्य बाजार आवार तथा फळे व भाजीपाला विभागात सौरउर्जा प्रकल्प राबविण्याचा मानस आहे तसेच जनरेटरची क्षमता वाढवुन नविन जनरेटरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच पिण्याचे पाण्याची पन्नास हजार दशलक्ष लिटर क्षमता असलेली टाकीचे बांधकाम करण्यात येणार आहे.

७) समितीचे फळ विभागात खुल्या प्लेटफॉर्मचे संपुर्ण काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे तसेच कर्मशिअल कॉम्पलेक्स वरील दुसऱ्या मजल्याचे बांधकाम व फळे विभागातील दुकानांचे वर पहिल्या मजल्याचे बांधकाम करण्यात येणार आहे.

८) शिराळा उपबाजार येथे कंपाऊंड वॉल व कमर्शिअल कॉम्पलेक्स, अद्यावत प्रशासकीय इमारत, गोदामचे बांधकाम करण्यात येणार आहे.

९) भातकुली, खोलापुर उपबाजार आवारात गुरांच्या बाजाराचे नियमन तथा शेतकऱ्यांकरीता पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

(१०) धान्य बाजार आवारात १०० मे. टन क्षमतेचा अद्यावत इलेक्ट्रॉनीक वजन काटा वसविण्यात येणार आहे. ११) बाजार समितीचे हमाल मापारी करीता हमाल भवनाचे बांधकाम करण्यात येणार आहे.

१२) पुढिल आर्थीक वर्षात आष्टी, माहुली, भातकुली रोड उपबाजार या ठिकाणी बाजार समितीचे पेट्रोल पंप उभारण्यात येणार आहे.

१३) बडनेरा गुरांचा बाजार गांडुळखत प्रकल्प उभारण्यात येत आहे.