बाजार समिती मार्फत शेतकऱ्यांकरीता आवश्यक असणाऱ्या सुविधांमध्ये बाजारभावाची माहिती शेतकऱ्यांना देण्याचे दृष्टिने SMS सुविधा विनामुल्य शेतकऱ्यांना पुरविले जातात. ताडपत्रीची व्यवस्था सुध्दा बाजार समितीने केलेली आहे. तसेच अद्यावत टिन शेड, जनरेटर, अडते/ खरेदीदार करीता दुकाने, शिदोरी गृह, सुलभ शौच्छालय, थंड पिण्याचे पाण्याच्या पाणपोई, शेतकऱ्याना माफक दरात भोजन व्यवस्था सुविधा, शेतकऱ्यांच्या शेतमालाचे चोरी पासुन संरक्षणाकरीता सी.सी.टी.व्ही कॅमेरा यंत्रणाव्दारे नियंत्रण केले आहे. तसेच आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांचे कुटूंबास अर्थसहाय्य देण्याचे दृष्टिने सदरचा प्रस्ताव शासनाकडे पाठविलेला आहे. तसेच तारण कर्ज योजने अंतर्गत ३६६ शेतकऱ्यांना रु. ४,२८,९२,९००/- तारण कर्ज वाटप केलेली आहे. इत्यादी सुविधा बाजार समितीने शेतकऱ्यांकरीता केलेल्या आहे.
१ विनामूल्य एसएमएस सुविधा-
या बाजार समितीमध्ये प्रथमच शेतकऱ्यांना बुद्ध दैनिक बाजारभावांची माहितीचा एसएमएस मोबाईलद्वारे विनामूल्य सेवा पुरविली जात आहे ही सेवा दिनांक 14 सप्टेंबर 2014 पासून नियमित आस्थागायात शेतकऱ्यांना पुरविण्यात येत आहे आज समिती 44,713 शेतकऱ्यांची एसएमएस सुविधेत नोंदणी झालेली असून दररोज सेवा पुरविल्या जात आहे
२ ताडपत्री सुविधा-
शेतकऱ्यांचा शेतमाल यार्ड वर आल्यानंतर पावसामुळे ओला होऊन खराब होऊ नये याकरिता अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत ताडपत्री पुरवण्यात येते
३ खुल्या ओट्यावर अद्यावत टीनशेडचे बांधकाम
केंद्र शासनाचे बळकटीकरण प्रतवारी व संरचना या योजनेअंतर्गत समितीने धान्य यार्ड वर ओपन प्लॅटफॉर्म वर भव्य टीन शेड उभारले तसेच इंटरनल रोडवर रिटेनिंग वॉलचे बांधकाम पूर्ण झालेले असून शेतकऱ्यांच्या शेतमालाचा हरास करणे करिता या माध्यमातून चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे याव्यतिरिक्त टीएमसी याड मध्ये अद्यावत pb शेडचे बांधकाम करण्यात आलेले आहे तसेच गाळणी यंत्र समोरील शेड सुद्धा पूर्ण करण्यात येणार आहे
४ ग्रामीण गोदाम योजना व एम एस सी पी प्रकल्प-
ग्रामीण गोदाम योजनेअंतर्गत अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीने शिराळा आष्टी भातकुली कोल्हापूर व नांदगाव पेठ येथे प्रत्येकी दोनशे मेघा टन क्षमतेचे गोदामाचे बांधकाम करण्यात आले आहे व एम एस सी पी प्रकल्पांतर्गत धान्य बाजारावर येथे 1200 मेगा टन व 1400 मेघा टन 600 मेघा टन गोदाम उभारण्यात आलेले आहे सदर गोदामाचे साठवणूक क्षमता वाढवल्यामुळे बाजार समिती स्वनिधीतून शेतमालतारण योजना राबवित आहे
५ जनरेटर सुविधा-
भारनियमनामुळे विद्युत पुरवठा बंद कालावधीत अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे जनरेटर द्वारे विद्युत पुरवठा करण्यात येत आहे त्यामुळे निर्माण होत असलेल्या अडचणीचे निराकरण होत आहे सोबतच समितीने जास्त क्षमतेचे नवीन जनरेटर खरेदी करण्याचा प्रस्ताव शासनास सादर केलेला असून मंजुरी प्राप्त होताच बसविण्यात येईल या व्यतिरिक्त शासकीय अनुदानावर व बाजार समितीच्या स्वनिधीतून सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यात येणार आहे
६ शिदोरी गृह सुविधा-
कृषी उत्पन्न बाजार समितीने नवीन कॉटन मार्केट यार्ड मध्ये शिदोरीगृह तयार करण्यात आलेले असून त्याचा शेतकरी वर्गाने लाभ घ्यावा
७ सुलभ शौचालय सुविधा-
अमरावती कृषी उत्पन्न समितीचे जुने यार्ड व नवीन यार्ड येथे शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सुलभ शौचालय बांधण्यात आलेले आहे सद्यस्थितीत नव्याने तीन सुलभ शौचालयाचे बांधकाम पूर्ण झालेले असून लवकरच सुरू करण्यात आले आहे
८ शेतमाल तारण योजना सुविधा-
सन 2020-21 या आर्थिक वर्षात समितीने शेतमाल तारण योजनेअंतर्गत 274 शेतकऱ्यांच्या 10249.3 क्विंटल शेतमाल कारण योजनेत ठेवलेला असून शेतकऱ्यांना रुपये दोन कोटी 59 लाख 2800 चे समितीचे समितीतून अग्रीम राशी धारण कर्ज वितरित करण्यात आलेली आहे कारण योजना राबविण्याच्या दृष्टीने बाजार समितीने 12 गोदामाचे बांधकाम केले आहे एकूण क्षमता 5200 मेघा टन आहे सदर योजनेच्या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा
९ अडत्या व्यापाऱ्यांकरीता नवीन दुकाने सुविधा-
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे धान्य यार्डवर पार्किंग पेमेंटचे समोरील कंपाउंड वॉलला लागून नवीन पन्नास गाळे व इतर अठरा मोठे गाळे बांधण्यात आले असून अर्धे खरेदीदार यांना वितरित करण्यात आले त्यामुळे दैनंदिन कामकाज सुरळीत होण्यास मदत झालेली आहे तसेच नव्याने बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये अडते व्यापाऱ्यांकरीता दुकाने बांधकाम सुरू आहे
१० बडनेरा उपबाजार धान्य यार्ड वर व्यवहार सुरळीत सुरू-
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार पेठ बडनेरा येथील धान्य यात बरेच दिवसांपासून बंद पडलेले होते सदर ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून धान्य यार पूर्ववत सुरू करण्यात आले आहे सद्यस्थितीमध्ये धान्य यार्डवर शेतकऱ्यांच्या शेतमालाची आवक येत असून लायसन्स धारक अडते व्यापारी व कामगारांमार्फत व्यवहार सुरळीत सुरू आहेत त्या ठिकाणी संपूर्ण बाजाराला संरक्षण भिंत बांधण्यात आलेली आहे तसेच लिलावा करिता काँक्रिटीकरण करून देण्यात आलेले आहे सोबतच वाढते व्यापारी करिता गाळे बांधकाम पूर्ण झालेले असून लवकरच वितरित करण्यात येणार आहे
११ मातेरा पद्धत बंद-
समितीचे यार्ड मध्ये पूर्वा व पार चालत आलेली मातेरा नेण्याची पद्धत दिनांक 7 मार्च 2007 पासून पूर्णतः बंद करण्यात आलेले असून त्याऐवजी स्त्री कामगारांना पैशाचे स्वरूपात मजुरी देण्यात येत आहे
१२ सीसीटीव्ही कॅमेरा-
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे धान्य यार्ड मध्ये शेतकऱ्यांचे शेतमालाची प्रचंड प्रमाणात आवक येत असल्याने शेतमालाची चोरी तथा संरक्षण अर्थ स्पीड डोम डिजिटल कॅमेरे मध्ये सुधारणा करून मुख्य ऍडव्हान्स अभी आर्ट वर नव्याने सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात चोऱ्यांवर नियंत्रण मिळवण्यात आलेले आहे
१३ बडनेरा गुरांचे यार्ड व धान्य यार्ड प्लॅटफॉर्म व शेडची सुविधा-
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे बडनेरा गुरांचे बाजार गार्डवर कंपाउंड वॉलचे बांधकाम शेडचे व डब्ल्यू बी एम रोड तसेच शेतकरी भवन पिण्याचे पाण्याची सुविधा व गुरांकरिता यांची सुविधा इत्यादी सुविधा करण्यात आलेली आहे तसेच बडनेरा धान्य यार्ड वर काँक्रिटीकरण सुलभ सौचालय व मुत्रीघर वोटे व प्लॅटफॉर्मचे बांधकाम करण्यात आलेले असून सदरची सुविधा बाजार समितीमार्फत शेतकऱ्यांकरिता करण्यात आलेली आहे
१४ चाळणी यंत्र-
उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाच योग्य भाव मिळावा याकरिता व शेतमालाची प्रतवारी सुधारण्याकरिता धान्य बाजार आवारात धान्य गाळण यंत्राद्वारे माफक दरात जाळणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे
१५ विकास आराखडा-
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकरिता पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातूनतसेच बाजार समितीच्या नियोजनबद्ध विकास व्हावा याकरिता पुढील पाच वर्षांकरिता करावयाच्या विकास कामांसाठी विकास आराखडा तयार केलेला आहे सदर विकास आराखड्यास माननीय पणन संचालन महाराष्ट्र राज्य पुणे यांची मंजुरात प्राप्त झालेली असून विकास आराखड्यानुसार शेतकऱ्यांकरिता यार्डवर सुविधा उपलब्ध करण्यात येईल
१६ शेतकऱ्यांकरिता माफक दरात भोजन व्यवस्था-
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना माफक रुपये पाच या दरात भोजन व्यवस्था टी एम सी आर डी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याव्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाचे शिवभोजन योजना सुद्धा सुरू आहेत करिता शेतकरी बंधूंनी या योजनेचा लाभ घ्यावा
१७ आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला अर्थसहाय्य-
आगामी काळात बाजार समितीचे निधीतून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करण्याच्या समितीच्या मानस असून शासनाची मंजुरी प्राप्त होताच अंमलबजावणी करण्यात येईल
१८ शेतकऱ्यांकरिता विश्रांती भवन-
अमरावती बाजार समिती ही जिल्हास्तरीय बाजार समिती असून या बाजार समितीमध्ये विविध तालुके जिल्ह्यातून त्याचा परराज्यातून शेतकरी शेतमाल विक्रीकरिता आणतो अशा परिस्थितीत विश्रांती भवनाची व्यवस्था करण्याचा मानस बाजार समितीचा असून समितीचे टीएमसी यार्ड वर सदरची व्यवस्था लवकर सुरू करण्यात येईल
१९ गुरे व फुले या शेतमालाचे नियमन-
अमरावती बाजार समितीचे उत्पन्न वाढीसाठी व शेतकऱ्यांना योग्य त्या सोयी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नव्याने भातकुली उपबाजार येथे गुरांचा बाजार नियमन करण्यात आले आहे तसेच दरवर्षी आमसभेत फुले उत्पादक शेतकऱ्यांची आमसभेत फुल बाजाराचे नियमन करणे संदर्भात मागणी असल्याने सदर शेतकऱ्यांची दखल घेत शासनाकडून फुले या शेतमालाचे धान्य बाजारातील टीएमसी यार्ड लगत जागेवर नियमन करण्याचे मंजुरी प्राप्त झालेली आहे लवकरच दोन्ही बाजार सुरू करण्यात येईल
२० इनाम योजना-
इनाम योजना केंद्रास व राज्य शासनाच्या महत्त्वकांशी योजना असून इनाम योजनेची अंमलबजावणी आपले बाजार समितीत सुरू झालेली आहे सदर योजने शेतकऱ्यांच्या शेतमालाची आवक लिहिला पेमेंट इत्यादी व व्यापाऱ्यांची जाणवत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करण्यात येणार आहे याकरिता धान्य बाजार आवाराचे मुख्यालयात स्वतंत्र इनाम योजना कक्ष स्थापन करण्यात आलेला असून त्याकरिता बाजार समितीचे निरीक्षक श्री राजेश इंगोले यांची इनाम योजना प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे सद्यस्थिती शेतमालाचे 100% आवक इ गेट एन्ट्री द्वारे करण्यात येत असूनही बीड सुरू करण्यात आलेली आहे याकरिता सर्व अडते व खरेदीदार यांना इनाम पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे त्याशिवाय लिलावात भाग घेता येणार नाही शासनाचे आदेशान्वये लवकरच बाजार बाजारातील संपूर्ण व्यवहार ही नाम योजनेद्वारे करण्यात येईल त्याकरिता सर्व अडते व व्यापारी यांच्या सहकार्य अपेक्षित आहे
२१ पिण्याच्या पाण्याची पाणपोई-
बाजार समितीने शेतकरी अडते खरेदीदार हमाल मापारी यांचे करिता टीएमसी आडवा धान्य यार्ड येथे एकूण दहा पानपोई उपलब्ध करून देण्यात आलेली आहे व या व्यतिरिक्त टीएमसी कार्डवर अद्यावत आरो प्लांट लावून पाणपोई चालू करण्यात येईल