विविध योजना राबवत असते. याच योजनेचा भाग म्हणून शेतमाल तारण योजना सुविधा सुद्धा अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे राबवण्यात येते.
महाराष्ट्र
राज्य कृषी पणन मंडळ पुणे तर्फे शेतमाल तारण कर्ज योजना पुरस्कार राबविण्यात येतो.
या पुरस्कारासाठी अमरावती कृषी उत्पन्न बाजारसमितीने सक्रिय सहभाग घेऊन उल्लेखनीय कामकाज केल्याबद्दल 2017-18 साली महाराष्ट्र राज्यकृषी पणन मंडळ पुणे तर्फे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीला द्वितीय पुरस्कार (अवर्ग उत्पन्न गट) देऊन गौरविण्यात आले.
सदर पुरस्कार वितरण सोहळ्याला तत्कालीन मंत्रीमा. ना. सुभाष देशमुख (सहकार पणन व वस्त्रोद्योग महाराष्ट्र शासन तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न मंडळपुणे) तसेच मा. ना. सदाशिव खोत (राज्य कृषी उत्पन्न व फलोत्पादन स्वच्छता आणि पाणीपुरवठा महाराष्ट्र शासन तथा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे) तसेच सर्व सन्माननीय संचालक व सुनील पवार कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे व दीपक शिंदे सरव्यवस्थापक उपस्थित होते.
शेतमाल तारण कर्ज योजना पुरस्कार 2017-18 द्वितीय पुरस्कार श्री दीपक विजयकर सचिव अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी माननीय नामदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते स्वीकारलाहोते.