Title

About Us

कृषक आणि कृषि हा राष्ट्राचा आधार स्तंभ असून त्यांच्या विकासात ह्या संस्थेचा असलेला सहयोग आणि संस्थेने केलेले कार्य या अहवाल रूपाने सादर करीत आहे. शेतकरी वर्ग हा सद्यातरी स्वयंपूर्ण झालेला नसून त्यांच्या उत्पादीत शेतमालाला योग्य किंमतीचा आधार प्राप्त झाल्याशिवाय इतर विकसीत वर्गाच्या तुलनेत यथायोग्य जीवन जगणे शक्य होणार नाही. शेतीमालाचे विपणन व्यवस्थेत असलेले दोष कमी करण्याचे दृष्टीने बाजार समित्या मार्फत प्रयत्न केले जात आहेत. शेतीमाल उत्पादकास योग्य तोल व मोल मिळावा, त्याने शेतमाल विकावयास आणले नंतर त्याची अडवणूक व फसवणूक होवू नये हे बाजार समितीचे कर्त्यव्य आहे.

या बाजार समितीची स्थापना सन १६ फेब्रुवारी १८७२ साली झाली असे उपलब्ध अभिलेखावर नमुद आहे. १८९७ साली बेरार कॉटन अँड ग्रेन मार्केट अॅक्ट अंमलात आला. सन १९३७ पासून वन्हाड प्रांताला सि.पी. कॉटन मार्केट अॅक्ट लागू करण्यात आला. सन १९५६ साली धान्य बाजार समिती सि.पी. अॅन्ड बेरार अॅग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केट चे कायद्यान्वये कापूस बाजार व धान्य बाजाराचे एकत्रिकरण होवून २० एप्रील १९७१ ला कृषि उत्पन्न बाजार समिती अमरावती अस्तित्वात आली. या कायद्याचे आधारे शेतकऱ्यांचे उत्पादीत मालाचे नियमन करून त्यांना योग्य भाव, वजन करण्याकरीता कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ, सेवकवर्ग, खरेदीवर, अडले. मापारी, हमाल, कामगार व मदतनिस इत्यादींचे परस्पर सहयोगाने शेतकरी समाजाची शक्य तितकी सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे व करीत आहे तो आपले अवलोकनार्थ सादर करीत आहे.

ह्या समितीचे अमरावती व भातकुली तालुक्याचे कार्यक्षेत्रातील शेती प्रामुख्याने काळी कसदार असून, सोयाबिन, तूर, कापुस, हरभरा व भुईमुंग ही प्रमुख पिके आहेत, याशिवाय करडी, तिळ, जेवस, सुर्यफुल, मुंग, उडीद, ज्वारी, गहू इत्यादी पिके सुध्दा घेतली जातात.

या बाजार समितीला गौरवशाली परंपरा असून अमरावतीला श्री अंबादेवीचे व एकविरादेवी पुराणित अधिष्ठान असुन ही ऐतिहासिक इंद्रपुरीनगरी कार्यक्षेत्र म्हणून मुख्यालयाकरीता लाभलेली आहे.

या नगरीला महान समाजसेवक कै. वीर वामनराव जोशी, कै. दादासाहेब खापर्डे के. शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख, के. दाजीसाहेब पटवर्धन शिवाय के. पद्मभुषण बॅ. रामराव देशमुख या थोर पुरूषांचा वारसा लाभलेला असुन सहकार महर्षि कै. भाऊसाहेब भोकरे यांचे सारखे थोर सामाजीक व सहकारी दृष्ट्यांचे नेतृत्व व सहकार्य या बाजार समितीचे विकासाला व भरभराटीला कारणीभुत आहे. या बाजार समितीचे. अमरावती तालुका व भातकुली असे दोन तालुक्याचे कार्यक्षेत्र आहे. तसेच या समितीचे खालील प्रमाणे उपबाजार आहेत.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना सन 16 फेब्रुवारी 1872 साली झाली असे उपलब्ध अभिलेखावर नमूद आहे. सन 1897 साली बेरार कॉटन अँड ग्रेन मार्केट ॲक्ट अमलात आला. सन 1937 पासून वऱ्हाड प्रांताला सीपी कॉटन मार्केट यार्ड लागू करण्यात आला. सन 1956 साली धान्य बाजार समिती सी.पी. अँड बेरार ॲग्रीकल्चर प्रोड्युस मार्केटचे कायद्यान्वये कापूस बाजार व धान्य बाजाराचे एकत्रीकरण होऊन 20 एप्रिल 1971 ला कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अस्तित्वात आली. या कायद्याचे आधारे शेतकऱ्यांचे उत्पादित मालाचे नियमन करून त्यांना योग्य भाव, वजन करण्याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ, सेवकवर्ग, खरेदीदार, अडते, मापारी, हमाल, कामगार व मदतनीस इत्यादींचे परस्पर संयोगाने शेतकरी समाजाची शक्य तितकी सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे व करीत आहे. तो आपले अवलोकनार्थ सादर करीत आहे.

या समितीचे अमरावती व भातकुली तालुक्याचे कार्यक्षेत्रातील शेती प्रामुख्याने काळी कसदार असून सोयाबीन,तूर, कापूस, हरभरा, व भुईमुंग ही प्रमुख पिके आहेत. याशिवाय करडी, तीळ, जवस, सूर्यफूल, मुंग, उडीद, ज्वारी,गहू इत्यादी पिके सुद्धा घेतली जातात.

या बाजार समितीला गौरवशाली परंपरा असून अमरावतीला श्री अंबा देवीचे व एकविरा देवीपुराणीत अधिष्ठानअसून ही ऐतिहासिक इंद्रपुरी नगरी कार्यक्षेत्र म्हणून मुख्यालयाकरिता लाभलेली आ.

या नगरीला महान समाजसेवक कै. वीर वामनराव जोशी, कै. दादासाहेब खापर्डे, कै. शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख, कै. दाजी साहेब पटवर्धन शिवाय कै. पद्मभूषण रामराव देशमुख या थोर पुरुषांचा वारसा लाभलेला असून सहकार महर्षी कै. भाऊराव भोकरे यांचे सारखे थोर सामाजिक व सहकारी दृष्ट्यांचे नेतृत्व व सहकार्य या बाजार समितीचे विकासाला व भरभराटीला कारणीभूत आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्रातील शेती प्रामुख्याने काळी कसदार असून बरेचशे कार्यक्षेत्र बागायत सुद्धा आहे. प्रामुख्याने कापूस, ज्वारी, तूर, भुईमुंग, सोयाबीन व काही संत्रा बागे आहेत. हे सर्व नगदी रक्कम देणारी पिके भरपूर प्रमाणात उत्पादित होतात.

या समितीने शेतकऱ्यांचे सोयकरिता समितीचे धान्य बाजारावर येथे 80% इलेक्ट्रॉनिक वजन काटा बसविला आहे. सदर काट्यावर शेतकऱ्यांच्या शेतमालाचे वजनमापा करिता कोणताही मोबदला न घेता शेतकऱ्यांना मोफत वजनमाप करून देण्यात येत आहेत. समितीने शेतकऱ्यांना बाजारभावाची माहिती देणे करिता भ्रमणध्वरीद्वारे बाजारभावाचे संदेश विनामूल्य माहिती शेतकऱ्यांना देत आहे.होते.

केंद्रीय बळकटीकरण योजनेअंतर्गत 70 हजार चौरस फूट जागेत भव्य टीनशेड उभारण्यात आलेले आहे. तसेच टीएमसी यार्डवर भव्य टीनशेड उभारण्यात आलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नैसर्गिक आपत्ती पासून संरक्षण होत आहे. सद्यस्थितीत विविध बांधकाम प्रकल्प सुरू असून सर्व सोई युक्त भव्य इमारतीचे बांधकाम लवकरच पूर्ण होत आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात बागायती क्षेत्र असल्यामुळे शेतकरी बऱ्याच प्रमाणात फुलशेती करीत आहे, अशा शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा याकरिता धान्य बाजार आवाराचे टीएमसी यार्ड लगत जागेवर फुलांचे खरेदी विक्रीचे व्यवहार करण्याकरिता जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याकरिता बाजार समितीने फुलांचे नियमन करण्याचा प्रस्ताव शासनाने मंजूर केलेला आहे लवकरच फुल बाजाराचे नियमन करून फुल बाजार चालू करण्यात येणार आहे. तसेच फुल शेती करण्याच्या व इतर उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी तळेगाव दाभाडे येथील प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आव्हान समिती तर्फे करण्यात येत आहे.

Mission

संत नगरी अमरावती

Mission

गाडगे महाराज

गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते..

Mission

गुलाबराव महाराज

गुलाबराव महाराज यांचा जन्म अमरावतीजवळ माधान येथे झाला. चार महिन्यांचे असतानाच त्यांना अंधत्व आले

Mission

तुकडोजी महाराज

तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन यांसाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.

Mission

पंजाबराव देशमुख

पंजाबराव देशमुख यांचा जन्म पापळ या गावचा आणि उच्च शिक्षण घेऊन स्वातंत्र्याच्या लढ्यात ते सहभागी झाले. स्वतंत्र भारतात कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली.

Mission

अंबादेवी मंदिर

तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन यांसाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.

Mission

एकवीरा देवी मंदिर

एकवीरा देवीचे मंदिर अंबादेवीच्या मंदिराच्या शेजारी आहे. मंदिराचे निर्माण १६६० इ.स च्या दरम्यान चे आहे.