Ideology

सभापती

मा. हरीश एकनाथजी मोरे

Ideology

उपसभापती

मा. श्री. भैय्यासाहेब धनराज निर्मळ

Ideology

सचिव

मा. श्री. दिपक केशवराव विजयकर

Shape
About
सामान्य माहिती

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना सन 16 फेब्रुवारी 1872 साली झाली असे उपलब्ध अभिलेखावर नमूद आहे. सन 1897 साली बेरार कॉटन अँड ग्रेन मार्केट ॲक्ट अमलात आला. सन 1937 पासून वऱ्हाड प्रांताला सीपी कॉटन मार्केट यार्ड लागू करण्यात आला. सन 1956 साली धान्य बाजार समिती सी.पी. अँड बेरार ॲग्रीकल्चर प्रोड्युस मार्केटचे कायद्यान्वये कापूस बाजार व धान्य बाजाराचे एकत्रीकरण होऊन 20 एप्रिल 1971 ला कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अस्तित्वात आली. या कायद्याचे आधारे शेतकऱ्यांचे उत्पादित मालाचे नियमन करून त्यांना योग्य भाव, वजन करण्याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ, सेवकवर्ग, खरेदीदार, अडते, मापारी, हमाल, कामगार व मदतनीस इत्यादींचे परस्पर संयोगाने शेतकरी समाजाची शक्य तितकी सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे व करीत आहे. तो आपले अवलोकनार्थ सादर करीत आहे.

या समितीचे अमरावती व भातकुली तालुक्याचे कार्यक्षेत्रातील शेती प्रामुख्याने काळी कसदार असून सोयाबीन, तूर, कापूस, हरभरा, व भुईमुंग ही प्रमुख पिके आहेत. याशिवाय करडी, तीळ, जवस, सूर्यफूल, मुंग, उडीद, ज्वारी, गहू इत्यादी पिके सुद्धा घेतली जातात

या बाजार समितीला गौरवशाली परंपरा असून अमरावतीला श्री अंबा देवीचे व एकविरा देवीपुराणीत अधिष्ठान असून ही ऐतिहासिक इंद्रपुरी नगरी कार्यक्षेत्र म्हणून मुख्यालयाकरिता लाभलेली आहे.

या नगरीला महान समाजसेवक कै. वीर वामनराव जोशी, कै. दादासाहेब खापर्डे, कै. शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख, कै. दाजी साहेब पटवर्धन शिवाय कै. पद्मभूषण रामराव देशमुख या थोर पुरुषांचा वारसा लाभलेला असून सहकार महर्षी कै. भाऊराव भोकरे यांचे सारखे थोर सामाजिक व सहकारी दृष्ट्यांचे नेतृत्व व सहकार्य या बाजार समितीचे विकासाला व भरभराटीला कारणीभूत आहे.

विभाग व क्षेत्रफळ

कृषी उत्पन्न बाजार समिती, अमरावती चे क्षेत्रफळ सुमारे ८६ एकर १ गुंठा असुन ते वेगवेगळ्या विभागात विभाजित झालेली आहे . ते खालीलप्रमाणे आहेत :

अ.क्र बाजार आवार क्षेत्रफळ
धान्य बाजार आवार १८ एकर १७ गुंठे
फळे व भाजीपाला आवार ८ एकर १४ गुंठे
टि. . एम. सी. आवार ५ एकर १० गुंठे
बडनेरा उपबाजार (धान्य) ४ एकर ३ गुंठे
बडनेरा गुंराचा बाजार ५ एकर
भातकुली उपबाजार ९ एकर १३ गुंठे
शिराळा उपबाजार ७ एकर ३ गुंठे
आष्टी उपबाजार ८ एकर
भाजीपाला उपबाजार (भातकुली रोड) ३ एकर २७ गुंठे
१० खोलापुर उपबाजार ८ एकर
११ माहुली (जहाँगीर) उपबाजार ८ एकर
१२ नांदगांव पेठ (ग्रामीण गोदाम) १ एकर

संचालक मंडळाची यादी