Title

Sachiv Speech

  • Home
  • Sachiv Speech
Ideology

सचिव

मा. श्री. दिपक केशवराव विजयकर

अमरावती कृषि उत्पन्न बाजार समितीची स्थापणा दि. १६ फेब्रुवारी १८७२ रोजी झाली. सद्यस्थितीत बाजार समितीचे कामकाज महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व नियमन) अधिनियम १९६३ व नियम १९६७ अन्वये चालते. बाजार समितीचे कायद्यानुसार पणन व्यवस्थेत अद्यावतपणा बरोबरच सुसुत्रता आणि समन्वयता आणण्याचे दृष्टिने सचिव / मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने महत्वपुर्ण कामकाज खालील प्रमाणे करण्यात येत आहे

बाजार समितीमध्ये पणन व्यवस्थेत आधुनिकीकरण, सुधारणा आणण्याबरोबरच बाजारातील पणन व्यवस्था मजबुत करण्याकरीता विविध प्रकल्प राबविणे, योजना राबविणे, नविन कार्यक्रम आखणे तसेच शेतकऱ्यांना योग्य बाजार भाव व त्यांच्या शेतमालाचे योग्य वजन-माप होण्याकरीता व बाजार समिती सक्षमरित्या चालविण्यासाठी नियोजनबध्द प्रयत्न करीत आहे.

१) शेतकऱ्यांच्या सुविधा निर्माण करणाऱ्या विकासासाठी बाजार समितीने हाती घेतलेले कार्यक्रम राबवुन या बाजार समितीमध्ये कामकाज करणारे घटक अडते, खरेदीदार, मापारी, हमाल कामगार तसेच संचालक मंडळ व कायम व हंगामी कर्मचारी यांचे समन्वय राखणे.

२) कलम ३५ नुसार बाजार समितीचा मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने प्रशासनावर नियंत्रण ठेवणे.

३) बाजार समितीच्या कामकाजात सुधारणा घडवुन आणण्यासाठी बाजार समितीमध्ये कामकाज करणारे घटक अडते, खरेदीदार, मापारी, हमाल कामगार तसेच संचालक मंडळ व कायम व हंगामी कर्मचारी यांना सल्ला देणे, योग्य ते मार्गदर्शन करणे.

४) बाजार समितीशी उत्पन्नाचे संबंधीत असलेल्या गोष्टींबाबत प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी आवश्यकती व्यवस्था करणे.

५) महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व नियमन) अधिनियम १९६३ व नियम १९६७ व उपविधी तथा सेवा नियमानुसार संचालक मंडळ जे धोरण, ठराव निश्चित करेल त्याची प्रशासना मार्फत अंमलबजावणी करणे.

६) कृषि विषयक व पणन संबंधातील विषयांबाबत चर्चा सत्रे, कार्यसत्रे व प्रदर्शने आयोजीत करणे किंवा त्याची व्यवस्था करणे.

७) बाजार समितीच्या संबंधात सर्व हिताच्या असतील अशा इतर गोष्टी करणे.

बाजार समितीची लिलाव प्रक्रिया व कार्यालयीन कामकाजाचे संगणकीय करण करणे.

९) शेतमाल तारण योजना राबविणे.

१०) राष्ट्रीय कृषि बाजार (ई-नाम) नुसार बाजार समितीचे कामकाज करणे.

मा. श्री. दिपक केशवराव विजयकर

मुख्य कार्यकारी अधिकारी,

कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती